Fly Ash Bricks मुळे बांधकाम होते भक्कम व टिकाऊ - सर्व्हे रिपोर्ट
चेन्नई येथील इंडीयन इंन्स्टीट्युट ऑफ मद्रास या संस्थेतील शास्त्रज्ञ प्रा रविंद्र गेट्टू यांनी सुमारे 50 प्रकारच्या काँक्रीटच्या 3000 हून अधिक चाचण्या घेतल्या. आणि निष्कर्षाअंती सांगितले की, फ्लाय ॲश व सिमेंट पासून बनलेले काँक्रीट हे जास्त मजबुत असते. यामुळे बांधकामातील टिकाऊपणा व मजबुतता वाढते. असे टाईम्स ऑफ इंडीयाच्या 16 नोव्हेंबर 2015 च्या नाशिक पुरवणीमध्ये पान 6 वर हे वृत्त प्रकाशित झाले आहे. यात असेही म्हटले आहे की, भारतात दरवर्षी 200 मिलियन टन्स फ्लाय ॲश थर्मल पॉवर स्टेशनमधून बाहेर पडते. परंतु त्यापैकी फक्त 30 मिलियन टन फ्लाय ॲश वापरात आणली जाते. म्हणून या ॲशचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.
फ्लाय ॲश मध्ये असलेल्या सिलिका आणि ॲल्युमिना मध्ये सिमेंट व पाणी मिसळले तर त्यांची अभिक्रिया होऊन काँक्रीटमध्ये टिकाऊपणा वाढतो असेही यात म्हटले आहे.
म्हणून मित्रांनो, योग्य प्रमाणात तयार केलेली फ्लाय ॲश ची वीट वापरुन आपल्या वास्तुचे बांधकाम टिकाऊ व भक्कम करु शकतो.
सदर लेख व वृत्तपत्रााचे कात्रण खाली दिलेले आहे.